You did not use the site, Click here to remain logged. Timeout: 60 second

WAKAN TALATHI वाकणचे तलाठी

82 lượt xem
Xuất bản 29/06/2016
5 हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत; जमीनमाफियांचा महसूली कर्मचाऱ्यांवर फास 'लांच देणे-घेणे गुन्हा'मग देणारा निर्दोष कसा? पोलादपूर (शैलेश पालकर)- पोलादपूर तालुक्यातील जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये महसूली कर्मचाऱ्यांना आर्थिक आमीषं दाखूवन वाढीव सहकार्य घेणाऱ्या जमीनमाफियांनी आता एखादे अडचणीचे काम करण्यास नकार देणाऱ्या महसूली कर्मचाऱ्यांना अधिक आमीष दाखवून ऍण्टी करप्शनच्या जाळयात अडकविण्याची धमकी देणे अथवा प्रत्यक्षात कृती करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असतानाच आज सोमवार, दि. 28 ऑक्टोबर 2013 रोजी ठाणे येथील ऍण्टी करप्शन ब्युरोकडून येथील मंडल कार्यालयामध्ये वाकणचे तलाठी दत्तात्रेय जाधव यांना 5 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आज दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास यानंतर पोलादपूर येथील मंडल कार्यालयामध्ये वाकणचे तलाठी दत्तात्रेय जाधव यांना 5 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती देऊन पोलीस इन्स्पेक्टर दिलीप विचारे यांनी अधिक माहिती देताना ठाणे येथे सध्या राहणारा आणि महाड तालुक्यातील दापोलीपाडा येथील तक्रारदार दिलीप रामचंद्र मोरे यांनी फेरफार, रजिस्टर नोंद, 712 उतारे आदी कामांसाठी वाकणचे तलाठी दत्तात्रेय जाधव यांनी 5 हजार रूपयांची मागणी केल्याने ठाणे येथील ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. यानुसार ऍण्टी करप्शन ब्युरोचे डीवायएसपी विवेक जोशी, पोलीस इन्स्पेक्टर दिलीप विचारे, पोलीस हवालदार चंद्रहास शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल बेटकर, सुनील पोळ, सुबोध म्हामूणकर, विलास जाधव यांच्या पथकाने पोलादपूर चावडीतील मंडल कार्यालयामध्ये सापळा रचून तलाठी दत्तात्रेय बंडू जाधव यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हयाची नोंद करून तलाठी दत्तात्रेय जाधव यांना अधिक तपासासाठी त्यांच्या घरी तसेच ठाणे परिमंडळाकडे नेण्यात आले.